‘उद्धव ठाकरेंमध्ये नाव घ्यायची हिंमत नाही, कारण त्यांना माहितीय की…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यातून अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानंतर नारायण राणे (narayan rane) यांचे चिरंजीवांनी टीकेची तोफ डागली आहे. नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन मुलांची बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणे (nilesh rane) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आव्हान (challange) दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या थकलेल्या आणि चिडलेल्या बापाचं भाषण होतं, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव आम्ही घेतलं नव्हतं, ते स्वत:च स्पष्टीकरण देत आहेत, मुलगा – वडील स्वत:च सांगत आहेत, आदित्य ठाकरे श्रावणबाळ आहे, असा टोला देखील नितेश राणे यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे पिता-पत्रावर हल्ला चढवला.

नाव न घेता उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका केली असं सगळे म्हणतात. नाव घ्यायची हिंमत त्यांच्यात नाही, त्यांना माहितीय चिरफाड होईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या टीकेला निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता टीका केली. मीही फावडा आणि पेंग्विन म्हणू शकतो, महाराष्ट्राला माहितीय फावडा कोण अन् पेंग्विन कोण. व्यासपीठावर जाऊन मीही काहीही बोलू शकतो, जर हे इथं थांबलं नाही तर मीही काहीही बोलेन. उद्धव ठाकरे ज्या भाषेत बोलले, त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर देणार, असेही निलेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी छताडावर पाय ठेऊन आडवे करुन अशी भाषा वापरू नये, त्यांना ती शोभत नाही. किती केसेस उद्धव ठाकरेंच्या अंगावर आहेत, किती केसेस आदित्यच्या अंगावर आहेत, पण शिवसैनिकांच्या अंगावर 10-10 केसेस आहेत. कमकुवत आणि कमजोर लोकांच्या अंगावर जाण्याचं काम शिवसेना करते. नशिबवान ते मुख्यमंत्री पद मिळालंय, भीक मागून, सगळे विचार वगैरे बाजूला ठेऊन हे सरकार बनलं असल्याची घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले, नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहेत आणि होऊन जाऊदे एकदा.. तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.