एकनाथ खडसेंवरून मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला, म्हणाले – ‘नेत्यानं पक्ष का सोडला याचा भाजपनं विचार करावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तर एकनाथ खडसे भाजपा सोडणार असल्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकेकाळी एनडीएचा भाग असलेले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भाजपाने विचार करण्याची गरज आहे की, त्यांचे नेते पक्ष सोडून का जात आहेत. ज्यांनी त्यांच्या सोबत सुरूवातीपासून काम केले, हे ते नेते आहेत ज्यांनी तेव्हा भाजपासाठी काम केले, जेव्हा पक्ष सत्तेत नव्हता.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही त्यांना (एनडीए) सोडले, नंतर अकाली दलाने साथ सोडली, परंतु आता त्यांचेच लोक पक्ष सोडत आहेत. भाजपाने विचार केला पाहिजे की, अखेर असे का होत आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे आणि म्हटले आहे की, त्यांचे महाविकास अघाडीत स्वागत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले की, एकनाथ खडसे शुक्रवारी एनसीपीमध्ये सहभागी होतील. तर पक्ष सोडण्यावर एकनाथ खडसे यांनी म्हटले की, ते 23 तारखेला एनसीपी जॉईन करतील. त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्यामध्ये काहीच सिद्ध झाले नाही. त्यांना राज्यातील एका नेत्याने हा त्रास दिला.परंतु, पक्षात त्यांना न्याय मिळाला नाही.

एनसीपीचे नेते आणि एकनाथ खडसे यांच्यात मागील काही दिवसांपासून या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. असा सुद्धा अंदाज आहे की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये एखादे मंत्रीपद खडसे यांना मिळू शकते.