‘या’ बाबतीत CM उद्धव ठाकरेंचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पावलावर ‘पाऊल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या सरकारचे खाते वाटप लवकरच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मंत्रीमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल हे शपथविधीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ठाकरे पिता पुत्र हे दोघेही मंत्रीमंडळात दिसणार आहेत. एकाच मंत्रीमंडळात पिता-पुत्र ही घटना इतिहासात दुर्मिळ असली तरी देशात हे सहाव्यांदा घडले आहे. आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या मंत्रीमंडळात देखील त्यांचे पुत्र के.टी. रामराव यांचा समावेश आहे.

काका-पुतणे, मामा-भाचे, वडिल-मुलगा असं चित्र याआधी पाहायला मिळाले आहे. मात्र पिता मुख्यमंत्री आणि पुत्र कॅबिनेटमंत्री अस पहिल्यांदाच घडत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः नेतृत्व करत मुख्यमंत्रीपद स्वीकारले एवढेच नाही तर पहिल्यांदा आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांना देखील कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले.

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर यांचे पुत्रच नव्हे तर भाचे देखील अर्थमंत्री आहेत. आंध्र प्रदेशमध्ये देखील टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र मंत्री होते. या व्यतिरिक्त तामिळनाडू, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये असं घडलेलं आहे.पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे याना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले यानंतर अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे जेष्ठ नेते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती अशा नाराजांची लवकरच मुख्यमंत्री भेट घेऊन नाराजी दूर करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/