home page top 1

उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यावरून युतीचे मित्र पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असा टोला आठवले यांनी लगावला आहे.

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारला केले लक्ष

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारला लक्ष केले होते. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत जाणार आहेत. यावेळी ते आपल्या विजयी झालेल्या खासदरांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर त्यांनी राम मंदिराचा अध्यादेश काढावा. त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख सांगा नंतरच इतर विषयावर बोलू असे उद्धव ठाकरे सांगून युतीचा मुद्दा लांबणीवर टाकला होता.

दौ-याची गरज नाही : आठवले

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याची सध्या गरज नाही. ठाकरे यांना अयोध्येत जाण्याचा अधिकार आहे, त्यांना राम मंदिर उभारण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. सरकार राम मंदिर उभारणार आहे. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालय निर्णय देत नाही तोपर्य़ंत राम मंदिर होऊ शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे दहा वेळा अयोध्येत गेले तरी राम मंदिर होणार नाही, असे आठवले म्हणाले.

Loading...
You might also like