Uddhav Thackeray | ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस PM मोदींच्या बाजूला बसला कसा?’; उद्धव ठाकरेंचा भाजपला प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे मत मांडले. कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी आणि भगतसिंह कोश्यारी एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्यावरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर टीका करत त्यांना प्रश्न विचारला आहे.

 

‘ही एकप्रकारे महाराष्ट्राची अवहेलना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला बसला, त्यामुळे महाराष्ट्राने नेमकं काय समजायचं? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपला विचारला. ठाण्यातील आंबेडकर चळवळीचे नेते अ‍ॅड. दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम शिवसेनाभवनात पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

 

पुढे ठाण्यातील तरुणांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशाबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी म्हणजे शिवसेना, मी म्हणजे सगळं काही असं नाही.
काही जणांना वाटतं शिवसेना संपली. काही जण शिवसेना स्वतःला समजत होते. आता ते संपले आहे.
महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात हा मोर्चा आहे. महाराष्ट्राची अवहेलना होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला बसला, त्यामुळे महाराष्ट्राने नेमकं काय समजायचं?”

 

Web Title :- Uddhav Thackeray | governor Bhagat Singh Koshyari who insulted shivaji mahraj sat next to modi say uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं, पण नातवालाच…’; आदित्य ठाकरेंनी व्यक्त मनातली खंत

Subramanian Swamy | सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींची केली रावणाबरोबर तुलना

Shriya Saran | श्रिया सरनच्या ‘या’ वक्त्यव्यामुळे ती चर्चेत; ‘या’ महिला अभिनेत्रीवर क्रश असल्याचे सांगितले