परळीतील गोपीनाथ गडावरील ‘त्या’ रांगोळीची सर्वत्र चर्चा, धनुष्यबाणावर ‘कमळ’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (मंगळवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यामध्ये ओल्या दुष्काळाची ते पाहणी करणार आहेत. परळी येथील गोपीनाथ गडावर दर्शनासाठी जाण्याचे ठरवल्यानंतर गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळीमध्ये धनुष्यबाणावर कमळ अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत संर्घष सुरु असून अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. त्यातच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवरील या रांगोळीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. फुलांच्या रांगोळीच्या बाजूला ‘आठवण साहेबांची’ असे लिहण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही मुंडे भगिनी परळीमध्ये नाहीत तर त्या मुंबईमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात राष्टपती राजवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची वाटचाल सुरु आहे. येत्या 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता सध्याच्या विधानसभेच्या कर्यकाळ संपून नवी विधानसभा अस्तित्वात येईल. सत्तास्थापनेबाबत भाजप-शिवसेनेत तोडगा निघाला नाही तर सहा मिहन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निवांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Visit : Policenama.com