शरद पवार कमी उंचीचे नेते ?, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप ( BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विविध नेत्यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी यावर भाष्य केले असून, संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी अभिनंदन मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांचं मत जाणून घेण्यासाठी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत. प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत,” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ”होय, आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचासुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवताहेत त्यात!, असे म्हणत पाटील यांच्यावर टीका केली.

काय टीका केली होती चंद्रकांत पाटील यांनी ? चंद्रकांत पाटलांची शरद पवार यांच्यावर टीका
पण तुम्ही मोदींवर, शाह याच्यांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणता, मला चंपा म्हणतात ते चालतं का? मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. मला पवारसाहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्यादृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे! असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

You might also like