Uddhav Thackeray | तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग, उद्धव ठाकरेंचा घणाघात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला दिले. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर घणाघात केला आहे. निवडणूक आयोगावरुन (Election Commission) आमचा विश्वास उडाला आहे, तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. पक्षा संबंधी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला आणि गद्दारांना चिन्ह दिल्याची टीका त्यांनी केली. मराठी भाषा दिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, भाजपला (BJP) वाटत ते काम आणि वाटेल तसं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोगँबोच्या कितीही पिढ्या उतरल्या तरीही शिवसेना संपणार नाही असं ठाकरे म्हणाले.

 

 

संस्कार चोरता येत नाही
शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाकी सगळं चोरता येईल पण आई-वडिलांनी केलेले संस्कार चोरता येत नाही. ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना चोरीचा माल लागतो अशी टीका त्यांनी केली. तुम्ही नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला पण तुम्ही ठाकरे हे नाव कसं चोरणार, हे ठाकरे सगळं शिवसेना कुटुंब आहे. आपले आई वडिल अडगळीत टाकून दुसऱ्यांचे बाप चोरता, लोक चोराल, विचार चोरता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता ठरवण्याचा काळ
ज्या-ज्या वेळी गद्दार त्यांच्या छातीवरती धनुष्यबाण लावाल त्या-त्या वेळी त्यांच्या गद्दारांच्या कपाळी लिहिलं असेल, अरे तूच गद्दार आहेस असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज निष्ठावान किती जन्माला आले आहेत आणि गद्दार औलादी किती जन्माला आल्या आहेत हे ठरवण्याचा काळ आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

तर मशाल पेटवावी लागेल
आजच्या बांडगुळांना वाटतंय तेच वटवृक्ष झालेत. पण त्यांची पाळमुळ छाटली की ते गळून पडतील हे त्यांनी ध्यानात ठेवावे.
अन्याय जाळायचा असेल तर मशाल पेटवावी लागेल. मी आम्ही आव्हान देतो, तुम्ही धनुष्य घेऊन या,
मी मशाल घेऊन येतो आणि बघुया लोक कोणासोबत आहेत ते.
दूध का दूध, पाणी का पाणी हे आम्ही करणार आणि तुमचं गोमूत्र कसं आहे हे देखील आम्ही सांगणार,
असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | It is not the Election Commission but the commission that limes, Uddhav Thackeray’s attack (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

Bhandara Crime News | भंडाऱ्यामध्ये रोड रोमिओने काढली तरुणीची छेड; लोकांकडून बेदम मारहाण

Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल