‘तेजस’च्या राजकीय प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थोरले सुपुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे राजकारणात येण्याविषयी विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण ठरले ते उद्धव ठाकरे यांच्या संगमनेर येथील जाहीर सभेला तेजस ठाकरे यांनी लावलेली उपस्थिती. मात्र या तर्कवितर्कांना उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.

संगमनेर महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले साहेब यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे साहेब यांनी संगमनेर मध्ये जाहीर सभा घेतली. सभेला उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र ते जंगलात रमणारे माणूस आहेत, असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

तेजस ठाकरे हे वन्यजीवांचा त्यामध्ये विशेषतः सरपटणाऱ्या प्राण्यांवर संशोधन करत आहेत. त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये खेकड्यांच्या 11दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. त्याविषयीचा त्यांचा शोध निबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

Visit : Policenama.com