Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray | कर्नाटक विधीमंडळात महाराष्ट्राविरोधात कर्नाटक सरकारने एक आठवड्यापूर्वी ठराव मंजूर केला होता. त्या विरोधात सैल भूमिका घेत असलेल्या सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाची विधीमंडळ अधिवेशनात चांगलीच कोंडी झाली होती. दरम्यान त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच त्याविरोधात प्रस्ताव आणू अशी ग्वाही विरोधकांना दिली होती. अखेर आज कर्नाटक विरोधात महाराष्ट्र सरकारने विधीमंडळात ठराव आणला. तो सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ‘आपल्या सर्वांना कल्पना आहे, की सध्या जो महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद कर्नाटककडून पुन्हा एकदा चिघळवण्यात आलेला आहे, पेटवण्यात आलेला आहे. आणि त्याबद्दल कर्नाटक सरकारने मागील काही दिवसांपूर्वी, विशेष म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांकडे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही त्यांनी ठराव मांडला. या ठरावात त्यांनी एक इंच सुद्धा जमीन आम्ही महाराष्ट्राला देणार नाही. असा एक आक्रमक आणि कौरवी थाटाचा ठराव केला. तो ठराव मांडल्यानंतर साहाजिकच आहे, महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात आपल्याकडूनही त्याला एक उत्तर देण्याची गरज होती. मी सरकारचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, की निदान तिथल्या सीमाभागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक, माता-भगिनी आणि बांधव आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा ठराव त्यांनी आज मंजूर केला, त्याला साहाजिकच आम्ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, तिथे दुमत असण्याचं कारण असूच नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आम्ही त्याला एकमताने पाठिंबा दिलेला आहे.’

तसेच यावर पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, ‘आम्ही पाठिंबा दिल्यानंतर
काही गोष्टी ज्या आम्हाला सूचवण्यात आल्या पाहिजे असं वाटतं, त्या आम्ही सभागृहातही सूचवणार आहोत
आणि प्रसारमाध्यमांसमोरही मांडतो आहोत. या ठरावात जे म्हटलंय की, तिथल्या नागरिकांना आपल्याकडून
काही सुविधा देण्यात येतील. आता त्यामध्ये थोडी स्पष्टता पाहिजे. आपण त्या लोकांना योजनांद्वारे लाभ देणार आहोत हा ठरावातील चांगला मुद्दा आहे. मूळ मुद्दा हा योजनांचा नाही तर भाषिक अत्याचाराचा आहे.
आपण भाषिक अत्याचाराबाबत काय करणार आहोत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. असेही ते सीमावादाबाबत बोलताना म्हणाले.

तसेच तो भूभाग केंद्रशासित झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत
नाही तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित करावा अशी आमची मागणी आहे. असेही उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

Web Title :- Uddhav Thackeray | maharashtra karnataka border dispute uddhav thackerays first reaction after the resolution against karnataka was passed unanimously

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Katrina Kaif | कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल