Uddhav Thackeray | ‘बरेच बॉम्ब, वातीही काढल्यात, आता पेटवण्याची गरज’, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आमच्याकडे बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत. आता पेटवण्याची गरज असल्याचे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. तसेच सीमाभागात (Maharashtra Karnataka Border Dispute) लाखो मराठी भाषिकांवर अन्याय होतोय त्यावर ठराव मांडणं गरजेचे आहे. तुम्ही आमच्यात असताना लाठ्या काठ्या खाल्ल्या म्हणून तुम्ही गप्प बसा असं होत नाही. केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत या मुद्यावर उत्तर नाही. हे अनैतिक सरकार असल्याने त्यांच्याकडून नैतिकता अपेक्षित नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टीका केली. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

नवस फेडण्यासाठी दिल्लीला जावं लागतं

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शेतकरी उघड्यावर सोडलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्री हिंदुत्व मानणारे आहेत. म्हणून वारंवार देवदर्शनाला जातात. त्यामुळे त्यांना नवस करणं आणि फेडणे यासाठी दिल्लीला जावं लागतं. आजचा दिवस गेला म्हणून नवस फेडतायेत आणि उद्याचा दिवस नीट जाऊ द्या यासाठी नवस करतात. त्यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

 

 

 

अधिवेशनाचे 7 दिवस कुणी वाया घालवले?

दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमाप्रश्न आणि महाराष्ट्राचा फायदा काय झाला? अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कुठे पंचनामे झाले? कुठे मदत मिळाली? महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्न आम्ही मांडले आहेत. परंतु त्यावर किती खर्च होतेय हे सगळ्यांना माहित आहे. अधिवेशनाचे (Winter Session) सात दिवस कुणी वाया घालवले? ज्याने वाया घालवले त्याला जाब विचारा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला

गेली अनेक वर्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हा प्रश्न प्रलंबित आहे. न्यायालयात विषय असताना दोन्ही राज्यांनी संयम पाळणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्रच फक्त संयम पाळत आहे. कर्नाटक सरकार संयम पाळताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयात विषय असताना बेळगावचे नामकरण करुन उपराजधानीचा दर्जा दिला. मराठी भाषिकांवर अन्याय सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Web Title :- Uddhav Thackeray | maharashtra winter session excm mlc uddhav thackeray criticized the shinde fadnavis government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारचा अनोखा अंदाज पाहून ट्विंकल खन्नाने केले ट्रोल

Ashish Shelar | ‘काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा