नारायण राणेंचा सेनेवर ‘प्रहार’ ! CM उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत, तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी भाजपशी गद्दारी करून मुख्यमंत्रिपदावर बसले आहेत. हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार ? शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे (uddhav-thackeray-not-hindutva-ideology) नाहीत, पदासाठी तडजोड करणारे आहेत. त्यामुळे शिवसेना हिंदुत्व असे समीकरण होतच नाही, असा जोरदार टोला भाजप नेते नारायण राणे ( bjp-leader-narayan-rane) यांनी मुख्यमंत्री ठाकरे व शिवसेनेस लगावला आहे.

 

 

 

 

 

पालघरमधील साधूंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांच्याकडून खारपासून ते गडचिंचले गावापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत आ. कदम यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सुटका केली. यावेळी नारायण राणे आणि आमदार नीतेश राणेंनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी आ. कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकार धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, पालघरमध्ये साधूंच्या हत्येला इतके दिवस झाले तरी कारवाई नाही. सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, या ठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.

तर नारायण राणे म्हणाले, पालघरमध्ये ज्यापद्धतीने साधूंवर हल्ला झाला, हत्या झाली; परंतु आरोपींवर कारवाई होत नाही म्हणून भाजप आमदार राम कदम यांनी आंदोलन पुकारले आहे. हिंदुस्तान साधुसंताचा देश आहे, साधुसंतावर अन्याय होऊ नये, यासाठी आंदोलन छेडले होते. पालघरचा तपास सीबीआयकडे द्यावा. महाराष्ट्रात जे सरकार बसले आहे. त्यांची साधूंना न्याय देण्याची इच्छा नाही, असे नारायण राणेंनी सांगितले.