Uddhav Thackeray On Amit Shah | ‘अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह’ उद्धव ठाकरेंची जहरी टीका; म्हणाले – “ढेकणं चिरडायची असतात…”

Uddhav Thackeray On Amit Shah | shivsena uddhav thackeray criticizes devendra fadnavis amit shah in pune
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray On Amit Shah | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा (Shiv Sankalp Melawa) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला. याअगोदर पुण्यातच मागील काही दिवसात भाजपचे महाअधिवेशन पार पडले. यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती.

शाह यांनी उद्धव ठाकरे हे ‘औरंगजेब फॅन क्लब’ चे (Aurangzeb Fan Club) नेते असल्याचे म्हणत निशाणा साधला होता. त्यानंतर आजच्या या सभेत उद्धव ठाकरे कसे प्रत्युत्तर देणार याबाबतची उत्सुकता होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे.

फडणवीसांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष.

मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस,” अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे यांनी केली.

अमित शाहांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, ” काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते. पण ते परत का आले? महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले हे पाहण्यासाठी ते आले.

अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर केली.

“मुनगंटीवारांनी वाघनखं आणली. अहो मुनगंटीवार नखाच्या मागे वाघ असतो तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या नखांच्या मागे मुनगंटीवार असतील तर ते कुठेतरी जुळत आहे का? महाराष्ट्रातील वाघनखे ही महाराष्ट्राची जनता आहे,” असाही खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Maval Pune News | धर्मेंद्र- हेमामालिनीला न्यायालयाचा दिलासा; मावळातील जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याचा दावा फेटाळला

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?

Total
0
Shares
Related Posts