मुंबईतील ‘त्या’ मोठ्या दुर्घटनेकडे शिवसेना पक्षप्रमुखांचे दुर्लक्ष 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ काल (गुरुवारी) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचा पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. दरम्यान महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असे बोलले जात असताना, ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे. त्याच शिवसेना पक्षप्रमुखांना या घटनेबाबत संवेदनशीलता नाही असे बोलले जात आहे.

मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रचारासाठी अमरावतीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे सीएसएमटीतील पूल अपघाताला कित्येक तास उलटून गेले तरी उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी भेट दिली नाही तिकडे फिरकले देखील नाहीत. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील जखमींची विचारपूस देखील केली नाही . ही बाब असंवेदनशील मनाली जात आहे.

त्यांना अमरावती दौरा प्रिय ?

युती होण्यापूर्वी वारंवार फडणवीस सरकार वर टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी युतीनंतर मात्र मवाळ भूमिका घेतली आहे. मुंबईतील महत्वाची घटना सोडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मातोश्री आणि दुर्घटना झालेले स्थळ यांच्यात केवळ १८ किमीचे आंतर आहे. तरी देखील सेनेच्या पक्षप्रमुखांनी घटनास्थळी भेट देण्याचे औदार्य दाखवले नाही.

अमरावती यथे शिवसेना-भाजप युतीच्या संयुक्त प्रचारसभेला उद्धव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, ते राष्ट्रहिताचे होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं . मात्र पूल दुर्घटनेविषयी चकार शब्दही काढला नाही . त्यामुळे आपली मुंबई म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांची संवेदशीलता गेली कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us