विधानसभा जागा वाटप ! BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला ‘किंमत’ न देता उध्दव ठाकरेंनी केलं ‘सूचक’ विधान, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच जागावाटपाविषयी विधान केले होते. मात्र त्यांचे विधान गांभीर्याने घेत नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचित केले आहे. जागावाटपाचा अधिकार केवळ मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचाच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे.

जागावाटपाविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच आहे. युतीच्या चर्चेत आपण मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशिवाय कोणालाही गृहीत धरत नाही. ‘

जागावाटपाविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेखही ठाकरे यांनी टाळला. तसेच जागावाटपाच्या चर्चेत आपण मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशिवाय कोणालाही गांभीर्याने घेत नाही हे उद्धव ठाकरे यांनी सूचित केले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील –

युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागपूर येथे बोलताना केले होते. जुने समीकरण आता योग्य ठरणार नाही व त्याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या