Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीत’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही,’ असं स्पष्टच शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं. राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी भाजपसह (BJP) एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray On Eknath Shinde)

 

शिवसेना भवनातून संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रथम नव्या सरकारचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी आरे प्रकल्पावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला. “माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका,” असे वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे म्हणत मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका,’ असेही ते म्हणाले.

 

“मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा अस ठरलं होतं. याबद्दल गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता.” असं देखील ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही,’ असं स्पष्टच उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही…
“मागील काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या.
माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी असल्याचे ठाकरे म्हणाले.
माझं पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे.
सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कदीही प्रतारणा करणार नसल्याचं,” उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray On Eknath Shinde | former cm uddhav thackeray maharashtra politics eknath shinde is not shivsena cm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’

 

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

 

Pune Crime | शिवीगाळ का करतो, असे विचारल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न