Uddhav Thackeray On Election Commission | उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, मोदी सरकार पराभवाच्या…

मुंबई : Uddhav Thackeray On Election Commission | मला असं वाटतंय, मोदी सरकार (Modi Govt) त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करत आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मते नोंदवताना केली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागरिकांना आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नागरिकांना आवाहन करतो की, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. मतदान केंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज २० तारीख. महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा थांबणार आहे. मी सकाळपासून विविध भागांची माहिती घेतली. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला दहा-दहा, पंधरा-पंधरा मेसेज जात आहेत. त्याप्रमाणे मतदार उतरलेले आहेत. खूप गर्दी आहे. पण निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Uddhav Thackeray On Election Commission)

उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाचे जे तथाकथिक प्रतिनिधी मतदान केंद्रात बसले आहेत,
त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांमधील नावे दोन ते तीनवेळा तपासली जात आहेत.
एकतर ज्येष्ठ मतदारांना उन्हाचा खूप त्रास झाला आहे. इतरही मतदारांना त्रास झाला आहे. यामध्ये महिला सुद्धा आहेत.

कुठे कसलीही सोय नाही. पिण्याचे पाणी नाही. तरीदेखील मतदार रांगा लावून उभे आहेत.
हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागत आहे,
असा आरोप ठाकरे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती

Pune BJP On Kalyani Nagar Accident | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात भाजप आक्रमक,
रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब व बारवर कारवाई करण्याची मागणी