Uddhav Thackeray On Maharashtra Budget | अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका, ”कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात”

मुंबई : Uddhav Thackeray On Maharashtra Budget | आजचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सादर केला आहे. काही जिल्हे अवकाळीच्या संकटात आहेत. फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे. लाखो-करोडोंच्या योजनांची नुसती घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आज महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली.(Uddhav Thackeray On Maharashtra Budget)

उद्धव ठाकरे म्हणाले, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. औषधांविना, डॉक्टरांविना असलेल्या रुग्णालयांकडे लक्ष दिलेले नाही. आधीच्या घोषणांचे काय झाले? त्याचा पाठपुरावा नाही. नव्या घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचा असे सरकारचे धोरण आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी भाषा, शिवरायांचे गड किल्ले याबाबत काहीही भूमिका नाही. शिवस्मारकाचे जलपूजन मोदींनी केले होते पण त्याची गॅरंटी कोण घेणार? हे कोणी सांगत नाही. पुढचे पाठ मागचे सपाट असा अर्थसंकल्प आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मनोज जरांगेंच्या पहिल्या आंदोलनात लाठीचार्ज केला. छऱ्यांच्या बंदुका वापरल्या,
अश्रूधूराचा मारा झाला. अतिरेकी घुसलेत असे वागवले. आमच्याकडून कोणी किती फोन केले? रश्मी शुक्लांना जरा विचारा.
देवेंद्र फडणवीसांनी तो रेकॉर्ड घ्यावा. आम्ही जरांगेंच्या मागे असलो तरीही त्यांचे काय चुकत आहे ते सांगा.

उद्धव ठाकरे म्हणाले, कुणीही आंदोलनाला उभे राहिले तर त्यांना गुन्हेगार ठरवले का? एखाद्याची मागणी पूर्ण करता
येत नसेल तर त्याला विश्वासात घेणे हे महत्त्वाचे असते. जो विश्वासात घेऊ शकत नाही असा राज्यकर्त बिनकामाचा असतो.

उद्धव ठाकरे म्हणाले, जरांगेंच्या मागे लागण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा.
आम्ही त्यांच्या मागे आहोत असा आरोप करत असाल तर गुलाल कुणी उधळला होता? फटाके कुणी फोडले होते?
एसआयटी लावणार असाल तर चिवटपणाने चौकशी करा, मधेच सोडून देऊ नका.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत