Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)

Uddhav Thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray On Rahul Narvekar | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी निकाल दिला आहे. या निकालाचे पडसाद आता राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून त्यांचे बाजूने निकाल लागल्याचे सांगितले जात आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून हा निकाल आमच्या बाजूने लागल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) घेणार आहेत. ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आज (शुक्रवार) उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्वेकर यांना योग्य तो निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. (Uddhav Thackeray On Rahul Narvekar)

महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे

सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणीवर मेलेल्या पोपटाचं उदाहरण देऊन उद्धव ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली आहे. काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला आहे, तो हलत नाही, डोळे उघडत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचं काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. विधानसभा अध्यक्ष आधी आमच्याकडे होते. आता भाजपात (BJP) आहेत. त्यांना राजकीय प्रवासाची माहिती आहे. तो प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. संपूर्ण जगात महाराष्ट्राची अवहेलना चालली आहे. महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray On Rahul Narvekar)

आपण जनतेचा कौल स्वीकारु

काल जे घडले, त्यावर अनेक जण त्यांच्या चष्म्यातून बघू शकतात. मेलेला पोपट हातात घेऊन मागून मिठूमिठू करणारी लोकं आहेत. तात्पुरतं जीवदान मिळाले आहे. मला वाटतं की महाराष्ट्राची ही अवहेलना थांबली पाहिजे. माझ्याप्रमाणे नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा (Resignation) दिला पाहिजे. न्यायालयाने सगळी लक्तरं वेशीला टांगल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ. लोकशाहीत शेवटचं न्यायालय जनतेचं असतं. आपण जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत आहे? आपण जनतेचा कौल स्विकारु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जर काही वेडंवाकडं झालं तर…

अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या
(Election Commission) निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही
वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत.
त्यानंतर जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
आज तर विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर यावे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना दिला आहे.

Web Title :- Uddhav Thackeray On Rahul Narvekar | Shivsena uddhav thackeray targets maharashtra assembly speaker rahul narvekar cm eknath shinde in pc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – घोरपडी पोलिस चौकीत राडा ! साडी फेडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, 5 जणांना अटक

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर