Uddhav Thackeray on Raj Thackeray | ‘राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत’; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदूत्त्वाचा मुद्दा पकडत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) घेतलेल्या दोन्ही सभांमध्ये शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला (NCP) लक्ष्य केलं होतं. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray on Raj Thackeray) निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे (Uddhav Thackeray on Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

राज ठाकरे ही भाजपची ‘बी’ टीम नाहीतर ‘ढ’ टीम आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुन्नाभाई’ चित्रपटामध्ये (Munnabhai Movie) गांधीजी वाचून आपण गांधीजींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. त्याप्रमाणे राज ठाकरे हे आपण बाळासाहेब ठाकरे आहोत असे समजू लागले असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

अयोध्येमध्ये (Ayodhya) श्रीरामाचं मंदिर (Shriram Temple) व्हावे यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी मनसे काय करत होती?, बाबरी मशिद प्रकरणावेळी (Babri Masjid case) राज ठाकरे कुठे होते?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांंनी खासदारांची बैठक घेतली होती त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीमध्ये, सरकारची काम जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, मनसे पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधलेला असून त्यांची बेगडी रूप लोकांना दाखवून द्या, असं असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिली.

 

Web Title :- Uddhav Thackeray on Raj Thackeray | cm uddhav thackeray allege raj thackeray feel himself as balasaheb thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kangana Ranaut Lady Boss Look | कंगना रनौतच्या लेडी बॉस लूकनं इंटरनेटवर लावली आग, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष..

 

Disha Patani Superhot Photo | दिशा पटानीच्या हॉट फोटोनं चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

Social Media Convention | सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकतेची गरज; मराठी सोशल मीडिया संमेलनात तज्ज्ञांचे मत

 

Gopichand Padalkar On Sharad Pawar | पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले – ‘बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय’

 

Choreography Festival 2022 | ‘कोरियोग्राफी फेस्टिव्हल’ संपन्न ! नुपूर दैठणकर व आदिती भागवत यांचा नेत्रदीपक नृत्यविष्कार