Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची मुंबई पोलिसांकडून प्राथमिक चौकशी; राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करण्याची याचिका गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

 

ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला साडेअकरा कोटी रुपयांचा नफा झाला होता. यावर या याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्रोत काय? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत गौरी भिडेंनी केली आहे.

 

गौरी भिडे यांच्या या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे,
आदित्य आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि
न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | preliminary investigation into the unaccounted assets of former cm uddhav thackeray and his family is underway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…