Uddhav Thackeray | शेतकर्‍यांनो, हातातील आसुडाचा वापर करा, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचा संताप, म्हणाले – पहिला आसूड…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शेतकर्‍याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड (Rain in Maharashtra) नुकसान झाले आहे. यामुळे दिवाळीच्या सणात देखील शेतकरी चिंतातुर आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) स्पष्ट नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्याच्या दौरा केला. आज औरंगाबद येथे शेतकर्‍यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी शेतकर्‍यांना, हातातील आसुडाचा वापर करण्याचा सल्ला दिला. यावर भाजपा (BJP) आणि शिंदे गटात (Shinde Group) तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

आज औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना सल्ला दिला की, शेतकर्‍यांनी सत्ताधार्‍यांवर आसूड ओढावेत, त्यांना जाब विचारावा.

 

दरम्यान, ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाने ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना काहीही काम केले नाही. शेतकर्‍यांनी त्यांच्यावरच अगोदर आसूड ओढावेत. दानवे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दानवे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडले आहेत. त्यांनी काही ठिकाणी आपला दौरा केला आहे. याचे श्रेय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना द्यावे लागेल. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नव्हते. राज्यात फिरले नाहीत. त्यांनी घरी बसून काम केले होते. राजा जोपर्यंत जनतेत जाणार नाही, तोपर्यंत त्याला जनतेचे दु:ख कळणार, हे आम्ही त्यांना सांगितले. पण ते घराच्या बाहेर पडले नाही. आपले कुटुंब आपली जबाबदारी एवढेच काम त्यांनी केले.

 

दानवे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार फोडले. तेव्हा जनतेत गेल्याशिवाय जनतेचे समर्थन मिळत नाही,
हे त्यांना समजले आहे. ते आणखी किती ठिकाणी दौरा करतील याबाबत कल्पना नाही.
मात्र विरोधी पक्षातील माणूस जनतेत जाऊन प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली बाब आहे.
उद्धव ठाकरे यांना शेतकर्‍यांना सांगितले की, सत्ताधार्‍यांवर आसूड ओढावा. मात्र मला वाटते की पहिला आसूड त्यांच्यावरच ओढायला हवा.

 

दरम्यान, औरंगाबादच्या दौर्‍यावर असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना म्हटले की, काही झाले तरी तुम्ही धीर सोडू नका.
आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता रडायचे नाहीतर लढायचे. संकटे येत असतात त्या संकटांना सामोरे जायचे.
मी तुमच्यासोबत आहे. शिवसेना (Shivsena) तुमच्यासोबत आहे. संकट आल्यावर एक व्हा.
तुमच्या हातातील आसूड हा केवळ हातात घेऊन फिरून नका, त्याचा योग्य वेळी वापरही करा.

 

Web Title :- Uddhav Thackeray | raosaheb danve criticizes uddhav thackeray over his aurangabad visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषाने पथारी व्यावसायिक महिलेला भरदिवसा गंडा, फडके हौद परिसरातील घटना

Uddhav Thackeray | धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हाती दिला ‘आसूड’

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’