अयोध्या निकालावर उध्दव ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा निकाल लागल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की आजचा दिवस आनंदाचा आहे. न्यायालयाच्या निकालाचा सन्मान आहे. मागील 24 नोव्हेंबरला मी अयोध्येत गेलो होतो. त्यावेळी शिवनेरीवरुन मी माती घेऊन गेलो होतो, तेथे शरयू नदीची आरती केली होती. आता 1 वर्षाच्या आत हा निकाल आला याचा आनंद आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षानंतरचा वाद आज अखेर सुटला. हा वाद मिटल्याचा आनंद आहे. आज शिवसेना प्रमुखांची आठवण येणं स्वाभाविक आहे. तसेच लवकरच अडवाणीजींची मी भेट घेणार आहे, राम मंदिरासाठी त्याचे योगदान मोठे आहे.

आपण पुन्हा एकदा अयोध्येत जाणार असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी येत्या 24 तारखेला पुन्हा एकदा अयोध्येला जाईल. 2 – 3 दिवसांनी शिवनेरीवर देखील जाणार आहे.

आज अयोध्येसंबंधित निकालावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या उपस्थितीत सुनावणी होती, या सुनावणीचा निकाल आज समोर आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल –

पुरातत्व विभागाचे दावे न्यायालयाने ग्राह्य धरत प्रभू रामाचा जन्म अयोध्येतच झाला, याबाबत कोणताही वाद नाही हे मान्य केले आहे. तसेच फैजाबाद न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी शिय्या वक्फ बोर्डाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचे सांगत या जागेवर मंदिर उभारण्यासाठी येत्या 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्याच बरोबर मुस्लिमांना अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like