मुख्यमंत्री शिवसेनेचाच ! जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर उध्दव ठाकरेंचा ‘पुनरूच्चार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेवर पेच निर्माण झाला असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाने त्रस्त झाले आहेत. त्यासंबंधित आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर राज्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा कसा देता येईल यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहेत, त्यांना मदत करा, शेतकऱ्यांना मदत पोहचवण्यासाठी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत जिल्हा प्रमुख्यांना दिले.

शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासंबंधित मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेण्यात आली. शासनाकडून मदत पोहचत नसेल तर शिवसेनेकडून मदत कशी करता येईल यावर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले.

यावेळी बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ठामपणे सांगितले की, मुख्यमंत्री होणार तर तो शिवसेनेचाच होणार. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा करत आहे. तर भाजप देखील मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. परंतू शिवसेनेकडून होणाऱ्या या हालचालीमुळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेचं प्रधान्य शेतकऱ्यांना : एकनाथ शिंदे –

सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना आहे, योग्य वेळी योग्य निर्णय तेच घेतील ते शिवसेनेचे आमदारांना मान्य असेल. आमदार निवासाचे काम सुरु आहे, त्यामुळे आमदारांना रंगशारदामध्ये थांबवले आले, उद्धव ठाकरे येथे येऊन आमदारांशी चर्चा करतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर शिवसेनेला शेतकऱ्यांना प्राधान्य देणार असल्याचे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके