Uddhav Thackeray | संजय राऊतांचे ‘ते’ विधान अन् उद्धव ठाकरेंचे अमित शहांसोबत ‘लंच”, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडत असून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह मुख्य सचिव सिताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) दिल्लीत बैठकीला हजर आहेत. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहा यांच्यासोबत दुपारचे जेवण केले. याच दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यात एक विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे.

देशात वाढत असलेल्या नक्षवादी (naxalite) कारवाईच्या संदर्भात अमित शहा यांनी राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. यानंतर दुपारी अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत जेवण केले. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यात केलेले विधान आणि दिल्लीत उद्धव ठाकरेंनी अमित शहांसोबत केलले जेवण, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

काय म्हणाले राऊत ?

संजय राऊत म्हणाले, पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे.
पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत.
त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल, की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज ? पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका.
ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात ते पहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे.
त्याचा अंदाज घेतायेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे.
ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

Web Title :-  Uddhav Thackeray | Sanjay Raut’s statement in pune and Uddhav Thackeray’s lunch with Amit Shah in delhi, sparks discussions in political circles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7 घरगुती उपाय, मिळेल आराम

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,292 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Prices | सोने झाले 1359 रुपये स्वस्त ! जाणून घ्या आता गुंतवणूक केली तर 2021 अखेरपर्यंत किती मिळू शकतो नफा