‘शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे माझं वचन’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे माझं वचन आहे असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाप्रमुखांसह इतर इच्छुकांची या मेळाव्याला उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असं वचन दिलं. तसेच हे वचन पूर्ण कण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जे लोकांसाठी लढतात त्यांना सत्ता मिळते. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी मला सत्ता हवी आहे. काही दिवसांपूर्वी अनेक अफवा समोर आल्या की माझ्यात आणि अमित शहांमध्ये बिनसलं आहे. आमच्यात काहीही झालेलं नाही. सर्वकाही ठिक आहे. आमची चर्चा सुरू आहे. युती आहेच, येत्या 2-3 दिवसांत युतीची घोषणा करू. शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे माझं वचन आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार.” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसैनिक मेळाव्यातील इतर महत्त्वाचे मुद्दे-

– 288 इच्छुक उमेदवारांना बोलावलं
– शिवसैनिक मुख्यमंत्री होणार
– जे लोकांसाठी लढतात त्यांना सत्ता मिळेत
– आम्ही सूडाचं राजकारण करणार नाही
– सर्वांचे आभार मानण्यासाठीच हा मेळावा

Visit : Policenama.com