Uddhav Thackeray | आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाची शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍याला शिवीगाळ, थेट उद्धव ठाकरेंनी घेतली दखल, म्हणाले – एक काम कर…

मुंबई : Uddhav Thackeray | शिंदे गटाचे (Shinde Group) बंडखोर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) एका समर्थकामुळे अडचणीत आले आहेत. संतोष बांगर यांच्या कथित समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकार्‍याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल (Viral Audio Clip ) झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचे ऐकू येत आहे. (Uddhav Thackeray)

या प्रकरणाची दखल थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी घेतली असून महिला पदाधिकार्‍याची विचारपूस केली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बांगर यांचा समर्थक अयोध्या पोळ यांना वारंवार हिंगोलीत येण्याचे आव्हान देत आहे. ‘संतोष बांगर तुझा बाप आहे’, अशा भाषेत हा समर्थक या महिलेशी बोलत आहे.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वता अयोध्या पोळ यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी तिला पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

उद्धव ठाकरे आणि अयोध्या पोळ यांच्यातील संवाद –

उद्धव ठाकरे – तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा, फक्त काळजी घे.

अयोध्या पोळ – हो साहेब, मला ना जेव्हापासून ही गद्दारी झाली तेव्हापासून रोज प्रॉब्लेम आहे.

उद्धव ठाकरे – एक काम कर, पहिल्यांदा रितसर तक्रार करुन ठेव. करणार काही नाहीत, फक्त ते असेच
डिवचून-चिडवून चूक करायला लावतील. सोबत कोणी सैनिक वैगेरे असतात का?

अयोध्या पोळ – मुंबईत मी एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्ह्यात पालममध्ये असतात. मी भायखळ्यात 19 व्या मजल्यावर राहते. 23 व्या मजल्यावर रेकी करण्यासाठी काही मुलींना ठेवले आहे.

उद्धव ठाकरे – एक काम कर, तू मुंबईत असतेस ना, मी सीपींना सांगतो. सीपींकडे सुद्धा रितसर तक्रार करुन ठेव.

Web Title :- Uddhav Thackeray | shinde faction mla santosh bangar supporter audio clip yuva sena office bearer shivsena uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | मुलाच्या ऑपरेशनचा बहाणा करुन पैसे घेऊन केली फसवणूक; वडिल मुलीवर गुन्हा दाखल, मृत्यु पावलेल्या पतीच्या केल्या खोट्या सह्या

Home Remedy For Hair Fall | केस गळती थांबेल ताबडतोब, उगवतील नवीन केस, केवळ ‘या’ 3 तेलाने करा मालिश

Kitchen Hacks | कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवूनही सुकते का? ‘या’ 4 पद्धतीने फ्रेश राहतील भाज्या