Uddhav Thackeray | PM मोदी – HM शाहांशी संपर्क साधला ? फडणवीसांना फोन केला ? उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषद निवडणुकीनंतर (Legislative Council Election) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाला सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्ष वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्याशी संपर्क साधला होता, अशा आशयाच्या बातम्या आज समोर आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही फोन केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांशी संपर्क साधल्याच्या बातम्या ह्या अफवा आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या (BJP) कुठल्याही नेत्याला फोन केलेला नाही, असं शिवसेनेकडून (Shivsena) स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच उद्धव ठाकरे जे बोलायचं ते उघडपणे बोलतात, त्यामुळे कुठल्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांचे माध्यम सल्लागार हर्षल प्रधान (Media Consultant Harshal Pradhan) यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता.
फोनवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट एकनाथ शिंदेंना बाजुला करा आणि आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन केले.
एकनाथ शिंदेंची पॉवर का वाढवता आहात, थेट आमच्याशी बोला.
आपण भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करु, असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन कॉलद्वारे दिला होता.
मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही.
त्यामुळे, तुम्ही थेट अमित शाहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते,
अशा आशयाचे वृत्त सकाळी सर्व माध्यमांतून प्रसारित झाले होते.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray devendra fadanvis called devendra fadnavis then contacted modi shah uddhav thackeray said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा