Uddhav Thackeray | ‘काहींना असं वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली एक वस्तू, जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं’, उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काहींना असं वाटतं शिवसेना (Shivsena) ही उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे. जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. तसं नाही आहे. शिवसेनेची पायमुळं 62 वर्ष तर सरळ दिसत आहेच, पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबांनी या विचारांची पेरणी केली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव न घेता टोला लगावला. मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त (Marmik Vardhapan Din) आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, व्यंगचित्रकार (Cartoonist) काय असतो, व्यंगचित्रकार काय करु शकतो, याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मुंबईत, महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि देशात हिंदूंच काय झालं असतं, हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

मार्मिक बाबत बोलताना ते म्हणाले की, आजोबा बाळासाहेब म्हणायचे वयानं थकलं तरी चालेल पण विचाराने माणूस थकता कामा नये. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) विचार केला आणि व्यंगचित्र साप्ताहिक काढले. मुंबई मिळवली तरी मराठी माणसावर अन्याय होताच याची वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना आणि व्यंगचित्र काढली. आता व्यंगचित्रकार किती हा वादाचा विषय पण व्यंगचित्रकार असायलाच हवा.

 

हा कसला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव?
आपण दीडशे वर्ष गुलामगिरीत काढली आणि त्यानंतर आपल्याला अनेक संघर्ष करुन स्वातंत्र्य मिळालं.
आपण आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) साजरा करतोय, पण फक्त तिरंगा फडकावून देशभक्त होता येत नाही,
असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तुम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहात
पण यावेळी तुम्ही लोकशाहीला मृतावस्थेत नेत असाल तर हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कसला,
असा सवाल त्यांनी केला. तसेच अनेकांना घरावर तिरंगा लावयाचा आहे पण त्यांच्याकडे घर नाही
अशी अवस्था झाली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray to address party workers on marmiks 62nd anniversary give reaction on eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

 

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा