Uddhav Thackeray | भिडे यांच्याबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिली नवीन माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गौरी भिडे (Gauri Bhide) आणि अभय भिडे (Abhay Bhide) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. ह्यात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कुटुंबियांच्या संपत्तीची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती असून तिचा सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) आणि केंद्रीय अन्वेषन विभागातर्फे (Central Bureau of Investigation) सखोल आणि अभ्यासपूर्व तपास होणे गरजेचे आहे, असे म्हणत गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

 

या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला (Justice Sanjay Gangapurwala) आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा (Justice R. N. Laddha) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी काही त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्यांनी त्रुटी दूर करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भिडे यांच्या प्रकाशन व्यवसायातील काही जुन्या गोष्टी शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) उघड केल्या आहेत.

अभय भिडे यांच्या वडिलांनी प्रभादेवी भागात सिद्धिविनायक मंदिरासमोरच्या राजमुद्रा नावाची प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. त्यावेळी महापालिकेची बहुतेक कामे अशोक प्रिंटिंग प्रेसला मिळत होती. ती आपल्याला मिळावीत, अशोक प्रेसला मिळू नयेत यासाठी भिडे यांनी भरपूर खटाटोप आणि उपदव्याप केले होते. भिडे स्टँडिंग कमिटीच्या सदस्यांना देखील जाऊन भेटत होते, असा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दावा आहे. पण, अशोक प्रेसशी असलेले कंत्राट तोडणे आणि त्यांची कामे काढून राजमुद्राला देणे त्यावेळी शक्य नव्हते.

 

त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेची सत्ता आल्यावर भिडे अधिक सक्रिय झाले होते.
त्यांना काही कामे मिळाली. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मार्मिकचे अंक भिडे आपल्या प्रेसमध्ये छापून देत होते.
पालिकेची सारी कामे त्यांना तेव्हाही मिळाली नाहीत.
त्यामुळे त्यांचा शिवसेनेवर व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर राग होता, अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.

 

आता शिवसेना फुटली असून, शिंदे आणि फडणवीसांचे राज्य आले आहे.
त्यामुळे भिडे शिवसेनेवर असलेला जुना राग काढत आहेत.
त्यांच्यामागे भाजपचा (BJP) वरदहस्त देखील असला पाहिजे, असा ठाकरेंना संशय आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena sources claims about why bhide of dadar went to court against uddhav thackeray family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | पुण्यात वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, गाडीतून उतरत त्यांनी… (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | यवतमाळचे संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त