Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जून 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाले. यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बंडाचे नेतृत्व केले आणि शिवसेनेतून अनेक टप्प्यांत 40 आमदार आणि 13 खासदार फोडले. त्यामुळे शिवसेना पक्षाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. या बंडाला आर्थिक पाठबळ कोणी दिले, हा खरे तर संशोधनाचा विषय आहे, पण शिवसेनेने (Uddhav Thackeray) याचा खुलासा केला आहे. बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांनी शिंदे यांच्या बंडाला रसद पुरवली, असा दावा शिवसेनेने (Uddhav Thackeray) केला आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आर्थिक रसद पुरवण्यात एका बांधकाम व्यावसायिकाचा (बिल्डर) सहभाग आहे. आणि त्याचमुळे त्याला राज्य सरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. अजय आशर यांनी शिंदेंच्या बंडाला आर्थिक हातभार लावला होता. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारने त्याची परतफेड केली असल्याचा दावा शिवसेनेने (Uddhav Thackeray) केला आहे.

 

नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
पण ही संस्था केवळ अजय आशर यांच्यासाठी स्थापन करण्यात आली. कारण त्यांनी बंडात शिंदेंना पैसा पुरवला होता.
त्याची परतफेड म्हणून आता त्यांना या संस्थेच्या उपाध्यक्षपदी बसविण्यात आले आहे. सुरतला सर्व हिशेब झाला.
त्यानंतर सगळे गुवाहाटीला पळाले.
येथे त्यांच्या पंचतारांकित हॉटेलांचा खर्च त्यांना विविध सोयी यांची सर्व काळजी आशरने घेतली होती, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena thackeray faction claim that mitra vice president ajay ashar provide financial assistance to eknath shinde for collapsing thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार