Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray | राज्याचे हिवाळी अधिवेशन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून चांगलेच तापले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधे चांगलाच संघर्ष बघायला मिळतो आहे. त्यातच विधीमंडळातील शिवसेनेचे जुने कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले. आणि त्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेमधील शिवसेना कार्यालयावर देखील दावा केला. मात्र ठाकरे आणि शिंदे गटातील सदस्यांचा संघर्ष पाहून महापालिका आयुक्तांनी सर्व पक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आरएसएस कार्यालय भेटीवरून त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. तसेच त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना एक सल्ला दिला आहे.

यावेळी नागपूर येथे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, ‘आज ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मी मोहन भागवतांना विचारतोय की आपल्या कार्यालयाचा कोपरा न् कोपरा तपासून बघा. कुठे काही लिंबं वगैरे टाकलीत का ते. कदाचित ते आरएसएस कार्यालयातही ताबा घेण्यासाठी गेले असतील.’

तसेच त्यांनी विरोधकांनी अधिवेशनात सरकारची कोडी केल्या प्रकरणी देखील आपले मत नोंदवले. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, दोन आठवड्यापासून अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्याचे दिसतय. तसेच अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेस काय दिले, हा प्रश्न राहणार आहे. त्याचं उत्तर या सगळ्यांनी द्यायला पाहिजे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाची गोष्ट म्हणजे अधिवेशनादरम्यान रोज एकेका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. इतिहास पाहिला तर आरोपाची गंभीरता लक्षात घेऊन त्या त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले आहेत. पण यावेळी असं काही होईल असे वाटत नाही. पण गेल्या सहा महिन्यात हे सरकार नेमके काय करतयं. हे आता लोकांच्या समोर आले आहे. एनआयटीपासून या आरोपांना सुरूवात झाली. मग सत्तार, उदय सामंत या सगळ्यांच्या घोटाळ्याबाबत सरकार काय करणार आहे? असा सवाल देखील उद्धव ठकरे यांनी यावेळी उपस्थित केला. (Uddhav Thackeray)

दरम्यान, महापालिका कार्यालय वादावरून बोलताना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी
शिंदे गटाला चांगलेच लक्ष केले. ते म्हणाले, काल मिंधे गट मुंबई महापालिकेत गेला होता,
तर आज आरएसएस कार्यालयात गेला होता. ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वतः काही करण्याची ताकद नसते ते
सरळ सरळ चोऱ्या करत असतात. असा घणाघात त्यांनी शिंदे गटावर केला.
तसेच हा मानसोपचार तज्ज्ञांचा विषय आहे. काहींच्या मनात असा न्युनगंड असतो की आपण काहीच करू
शकत नाही. काहीतरी केले पाहिजे. त्यांना त्या न्युनगंडाची जाणिव असते. मग तशी लोकं त्या न्युनगंडाच
रूपांतर अहंगंडात करतात. दुसऱ्यांचे नेते, पक्ष, ऑफिसं बळकवायची. अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरेंनी
(Uddhav Thackeray) शिंदे गटावर केली आहे.

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray mocks cm eknath shinde in rss office nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार

Lavasa City Case | लवासाप्रकरणी न्यायालयात पुन्हा याचिका; अजित पवार म्हणाले पवार कुटुंबावर…