Uddhav Thackeray | कोर्टाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड – उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला तरी अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या निकालावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड केली आहे. राज्यपालांच्या भूमिकेचं वस्त्रहरण झालं असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी घटनापीठाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड केली आहे.
राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरणीय होती,
यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवं.
मात्र आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker)
सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळची शिवसेना (Shivsena) म्हणजे माझ्या शिवसेनेकडेच राहिल.
आता अध्यक्षांनी वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

म्हणून मी राजीनामा दिला

दरम्यान, निकाल देताना सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला असता, असे म्हटले.
त्यामुळे शिंदे सरकार वाचले.
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं.
म्हणून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा कोर्टाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा,
अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Web Title :- Uddhav Thackeray | Shivsena uddhav thackeray press conference on maharashtra political crisis result attacks governor eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती