राहुल गांधी तुमची गरिबी हटली ‘यांची’ कधी हटणार ? : उद्धव ठाकरे

औसा / लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर येथील औसा येथे भाजप शिवसेना महायुतिची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वप्रथम लातुरात सभेसाठी आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ‘भाजपाने जो जाहिरनामा प्रसिद्ध केला त्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. मात्र, राहुल गांधी तुम्हाला माहीत आहे का ? तुमच्या आजीबाईंपासून ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले जात आहेत. मात्र, तुमची गरिबी हटली यांची कधी हटणार ? असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना लगावला.

… म्हणून युती केली

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काल भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात आमचे जे मुद्दे होते ते सर्व या जाहीरनाम्यात आले आहेत. म्हणून शिवसेनेने भाजपसोबत युती केली. मग तो राम मंदिराचा मुद्दा असो किंवा जम्मू -कश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा असो, महत्वाचे म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या विकासाचा मुद्दा आहे. जो आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणूनच आम्ही युती केली असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात थापा

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात केवळ थापा लगावण्यात आल्या आहेत. काल भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. नशीब त्यांना वाचता येते. यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपाने जो जाहिरनामा प्रसिद्ध केला त्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. मात्र, राहुल गांधी तुम्हाला माहीत आहे का ? तुमच्या आजीबाईंपासून ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले जात आहेत. मात्र, सर्वसामान्य माणूस अजून देखील गरीबच राहिला आहे तुम्ही मात्र श्रीमंत झाला.’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

त्या कंपन्यांना वठणीवर आणा

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पीक विमा योजनेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “राज्यात पीक विमा योजनेसारख्या उत्तम योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, ज्या कंपन्यांना विमा योजनेची रक्कम देण्याचे काम दिले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कुठे ५० रुपयांचा चेक मिळतो. याकडे मात्र लक्ष दिले पाहिजे. कारण राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांनी आपला घामाचा पैसा पीक विमा योजनेत लावला आहे. म्हणून पंतप्रधानांना माझी विनंती आहे की, पीक विमा योजनेचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे. त्या कंपन्यांना आता वठणीवर आणा” असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.