राज ठाकरेंच्या ED चौकशीवर उद्धव ठाकरे म्हणतात . . .

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED ने नोटीस दिल्यानंतर याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत भाष्य केले आहे.

काँग्रेसच्या बंडखोर आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी राज ठाकरेंच्या ईडी कारवाई बाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता राज यांच्या ईडीच्या चौकशीतून काहीही साध्य होणार नाही असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. मात्र यावर अजून काही बोलण्याचे उद्धव यांनी टाळले.

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत मौन
या वेळी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत परतीबाबतच्या बातम्यांबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.

दरम्यान ईडीच्या चौकशीने काहीच साध्य होणार नाही असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. उद्या राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशी साठी जाणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like