आमचं विधानसभेचं गणित लोकसभेच्या आधीच जमलंय ! उद्धव ठाकरेंनी दाखवला चंद्रकांत पाटलांना ‘इंगा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना-भाजप युती बाबतचा निर्णय भाजपचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आपण घेवूत असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजप आणि शिवसेनेत युती होईल कि नाही यावरून एकमेकांवर टीका टिप्पणी होत असताना उद्धव ठाकरेंनी युती होण्याबाबत विश्वास व्यक्त केला.

युतीचा फॉर्मुला फिक्स झाला आहे, असं म्हणत महसूल मंत्री तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. आमचं विधानसभेसाठीचं गणित लोकसभेच्या आधीच ठरलं आहे. इतर लोकं काय बोलतात याचं आम्हाला काही देणं-घेणं नाही. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असेही ते म्हणाले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील
२०१४ ला जिकंलेल्या जागांवर चर्चा होणार नाही तर फक्त विद्यमान जागा व्यतिरिक्त बाकीच्या जागांवर चर्चा होईल असं पाटील यांनी युतीच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलं. येत्या विधानसभेसाठी शिवसेना- भाजप एकमेकाच्या चालू जागांना हात लावणार नाही. अशी दोन्ही भाजप आणि शिवसेना पक्षांची मानसिकता आहे असे ते म्हणाले.

याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगतीलं होतं कि, विद्यमान जागांव्यतिरिक्त जागांबाबत चर्चा केली जाईल. आता याची चंद्रकांत पाटलांनी पुरावृत्ती केली आहे. यावर ठाकरेंनी टोला लगावत युतीच्या जागावाटपाबाबत २०१४ च्या लोकसभा निवडणुकी आधीच ठरलं आहे असं वक्तव्य करून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

आरोग्यविषयक वृत्त –