उध्दव ठाकरेंच्या शपथविधीसाठी ‘या’ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह सोनिया गांधींना निमंत्रण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात उद्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथ ग्रहण समारंभाला अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. सोनिया गांधीना देखील उद्या शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. शिवाय देशभरातील सर्व काँग्रेसचे मुख्यमंत्री, एम. के. स्टॅलिन, ममता बॅनर्जी, तसेच अरविंद केजरीवाल यांना देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे नियंत्रण पाठण्यात आले आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती देताना सांगितले की देशातील काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांना उद्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला निमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील उद्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला येण्याचे आमंत्रण दिले आहे.

उद्या होणार शपथविधी
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. असे सांगण्यात येत आहे की 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 च्या सुमारास हा कार्यक्रम असेल. ज्यात देशभरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित असतील.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like