
Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यादांच शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. ‘नवनिर्वाचित मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. माझ्या पाठीत वार करुन झालेला मुख्यमंत्री हा शिवसैनिक होऊ शकत नाही. पदासाठी केलेला घात हा ठिक आहे. पण आरे सारख्या प्रोजेक्टबाबतचा निर्णय बदलून सरकारने मुंबईच्या काळाजात कट्यार घुसवली,’ अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलताना म्हणाले, “माझ्याशी वैर असू शकते. ते गेल्या काही दिवसांपासून लपून राहिलेले नाही. माझ्या पाठीत वार केला तरी चालेल पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसऊ नका,” असं आवाहन त्यांनी नव्या सरकारला केलं आहे. नवं सरकार स्थापन होताच आरे बाबत निर्णय घेतला गेला. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, “आरे’ प्रोजेक्टसाठी एका रात्रीत झाडांची कत्तल झाली होती.
त्यामुळे मुख्यमंत्री होताच या निर्णयाला स्थगिती दिली होती. असे असतानाही मुंबईच्या विकासाच्या आडवे न येता त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला होता.
कांजूर मार्ग होता, त्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, यात मतमतांतर असू शकते.
त्यामुळे सरकारला जे योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल, पण अपेक्षा एवढीच आहे की, मुंबईच्या हिताचे निर्णय व्हावेत.
पर्यावरण संवर्धनाच्या अनुशंगाने घेतलेल्या निर्णयात आता बदल केला जात आहे.” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Web Title :- Uddhav Thackeray| take decisions that will keep mumbais environment good what is uddhav thackerays appeal to the government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update