मी शपथ घेतो की…! उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची ‘शपथ’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले. आज शिवतार्थावर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक क्षण असलेला शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देशभरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. आज झालेल्या शपथविधीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी मंचावर राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

त्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली.

यावेळी ठाकरे सरकारमध्ये आज एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आज शिवतीर्थावर शपथ ग्रहणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानंतर महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला 29 वा मुख्यमंत्री मिळाला. यानंतर आज 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटची बैठक घेतील, ही बैठक सह्याद्री अतिथी ग्रहावर पार पडेल.

Visit : Policenama.com