सत्तेत असेल की नाही लवकरच समजेल : उद्धव ठाकरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेवरून सुरु असलेल्या सत्ता संर्घषामुळे राज्यात सरकार स्थापनेला वेळ लागत आहे. भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असताना देखील जागावाटपावरून दोन्ही पक्षात वाद सुरु आहे. असे असताना शिवसेनेकडून सत्ता स्थपानेचा दावा करुन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा दावा केला आहे. दरम्यान, शिवसेना सत्तेत असेल की नाही हे येणाऱ्या दिवसांत कळेलच, असे सुचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर दुपारी पत्रकारांशी बोलताना हे सुचक विधान केले आहे. तसेच राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली मदत अत्यंत त्रोटक असल्याचे सांगत, परतीचा पाऊस जाता जाता मी पुन्हा येईल म्हणतो, याची भीती वाटते, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे देखील काढले. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा नसतो, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. तसेच पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने केंद्र आणि राज्य सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

पंतप्रधानांनी लक्ष घालावं : 
केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावं, असे उद्धव ठाकरे म्हणले. तसेच पीक विमा कंपन्यांनीही आताच्या घडीला कागदी घोडे नाचवू नये. शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. तसंच बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा देणं थांबवावं अन्यथा विमा कंपन्यांप्रमाणे सर्व बँकांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या