शरद पवारांच्या ‘या’ अफवेकडे लक्ष देऊ नये, उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – “युतीत वाद सुरु असल्याच्या अफवा शरद पवार पसरवत असून त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण आपल्याला युतीतच लढायचे आहे”, असे आवाहन कार्यकर्त्यांना करताना आगामी विधानसभा लढत भाजप आणि शिवसेना एकत्रच लढणार असल्याचे संकेत शिवसेना कार्याध्यक्ष आज उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईत शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

युतीत वाद सुरु असल्याचा प्रचार शरद पवार करत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना त्यांच्याच भ्रमात राहू द्या कारण युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी सुरु असून लवकरच यासंदर्भात अंतिम निर्णय होईल असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल ‘पंचांग’ अद्याप माझ्याकडे नाही :

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारला असता याची कल्पना नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी याचे ‘पंचांग’ माझ्यापर्यंत पोहोचले नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे यासाठी होत असलेल्या चालढकलीवर टोमणा मारला. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार १६ जून ला होणार असल्याचे बोलले जात आहे परंतु यावेळी उद्धव ठाकरे मात्र अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत.

शेतीप्रश्नावर झाली पदाधिकाऱ्यांशी चर्चा :

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या समस्या, पीकविमा इत्यादी शेतीविषयक बाबींवर आणि जिल्यातील इतर प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. दुष्काळाच्या आणि मान्सून लांबणीच्या पार्श्वभूमीवर हि चर्चा झाल्याची समजते.

सिनेजगत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’