CM Uddhav Thackeray | PM मोदींच्या घोषणेनंतर CM ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘सर्वसामान्यांची ताकद देशाला कळली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | तीन कृषी कायदे (Agriculture Acts) रद्द करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे देशभरातून बोलले जात आहे. तसेच यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, ‘कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण, या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिलीय, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो. असं ते म्हणाले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘असो..आता सरकारला उपरती झाली,
आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरूनानक जयंतीच्या निमित्तानं केली,
त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो.
महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) या कृषी कायद्यांविरुद्ध (Farm Laws) आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं.
शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे.
केंद्र सरकारने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष
तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे,
म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही.
हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे,
असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | the announcement of repeal of the agriculture act is an example of the strength of the people said cm uddhav thackeray on modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation Elections | पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा, शनिवारी होणार प्रकाशन

Farm Laws | कृषी कायदे रद्द होताच अनेक सेलिब्रिटींनी केले शेतकऱ्यांचे अभिनंदन; कंगना मात्र भडकली

ST Driver Suicide | धक्कादायक ! आणखी एका ST चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

House Rent Allowance | घर मालकाकडे नसेल पॅनकार्ड तरी सुद्धा मिळवू शकता HRA वर टॅक्स सवलत; जाणून घ्या