Uddhav Thackeray | ‘भुरटे, चोर, गद्दार, शिवसेना नाव चोरू शकतात पण शिवसेना नाही’, उद्धव ठाकरे यांची जहरी टीका (व्हिडिओ)

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला दिले. यानंतर रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेडमध्ये पहिलीच जाहीर सभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही चुना लगाव आयोग असे म्हटले आहे.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लागाव आयोग’ आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत. वरुन जे आदेश येतात त्याप्रमाणे ते त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहण्याच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.

 

शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली
निवडणूक आयोगाने तत्वानुसार शिवसेना शिंदे गटाची असल्याचे सांगितलं ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपला कुत्रं विचारत नव्हतं
भाजपवर (BJP) निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला घुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, अशा शब्दात त्यांनी भाजपवर घणाघात केला.

 

आज माझ्याकडे काहीच नाही
आजपर्यंत जे जे शक्य होईल ते त्यांना दिलं. तरीदेखील आज ते सगळे खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीदेखील तुम्ही आज माझ्यासोबत आला आहेत. आज मी तुम्हाला मागायला आलो आहे. तुमचे आशीर्वाद अन् साथ पाहिजे. जे भुरटे, चोर, गद्दार, तोतया आहेत, ते शिवसेना नाव चोरू शकतात, पण शिवेसना नाही चोरू शकत. धनुष्यबाण चोरला असेल, पण तो तुम्हाला पेलवणार नाही. जिथे रावण उताणा पडला, तिथे हे मिंध्ये काय उभे राहणार असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

 

 

शिवसेना आमची आई
ही ढेकण आपलं रक्त पिऊन फुगले आहेत, त्यांना चिरडण्याची ताकत एका बोटात आहे. शिवसेना आमची आई आहे. ज्यांना आपलं कुटुंब मानलं, त्यांनीच आपल्या आईवरती वार केलाय. आम्ही म्हणजे शिवसेना, असा तुम्हाला गर्व असेल, तर शिवसेना नाव बाजुला काढा आणि तुमच्या आई-वडिलांचे नाव लावून पक्ष बांधून दाकवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

एक काळी टोपी वाला होता…
नाव गोठवलं, चिन्हं गोठवलं. ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं नाही, ते देखील आण्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत आहेत.
हे गद्दार तिकडे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर गेले. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते.
एक काळी टोपीवाला होता, गेला. त्यांनी शिवाजी महाराज, सावित्रीबाईंचा अपमान केला.
दिल्लीसमोर झुकण्याचे विचार बाळासाहेबांचे नव्हते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

चोरांना आशीर्वाद देणार का?
आजपासून भाजप आणि शिंदे गट मुंबईत आशीर्वाद यात्रा काढत आहेत, चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
मेघालयात ज्या संगमांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या मुलासोबत सत्तेसाठी गेले,
दुसऱ्यांवर घारणेशाहीचे आरोप करायचे आणि आपण मात्र उलटच वागायचं, अशी टीका त्यांनी केली.

 

Web Title :- Uddhav Thackeray | thieves traitors shiv sena can steal name but not shivsena Uddhav Thackeray fired the cannon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले…

Nashik Crime News | नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून 12 वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Prakash Ambedkar | ‘कसब्यातील विजय धंगेकरांचा’, प्रकाश आंबेडकरांचे मत (व्हिडिओ)