Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं जेपी नड्डांना थेट आव्हान; म्हणाले – ‘दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून यांना फक्त बळाचा वापर करायचा आहे असं दिसत आहे. देशात अतिशय घृणास्पद राजकारण भाजपकडून सुरु आहे. याकडे जनतेने डोळे उघडून बघण्याची वेळ आली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी जाऊन राऊतांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन जे.पी. नड्डा यांच्यावर हल्लाबोल केला.

 

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बिहारच्या पाटणामध्ये केलेल्या भाषणातील मुद्दे मांडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली.
देशात आता प्रादेशिक पक्ष शिल्लक राहिलेले नाहीत असं जेपी नड्डा बोलले यातूनच त्यांना देशात काय करायचं आहे हे लक्षात येतं.
देशात भाजप हा एकमेव पक्ष राहणार आहे असं ते म्हणाले हे विधान अत्यंत गंभीर आहे.
त्यांच्या विधानात लोकशाही कुठे आहे का? राजकारण एक बुद्धीबळ असल्याचं आपण म्हणतो.
पण त्यांच्याकडून फक्त बळाचा वापर केला जात आहे. बुद्धीचा वापर आता केला जात नाही.
पण एक लक्षात ठेवा दिवस फिरले तर तुमचं काय होईल याचा विचार जेपी नड्डा यांनी करावा, असा थेट इशारा ठाकरे यांनी दिला.

भाजपकडून सुरू असलेलं राजकारण घृणास्पद स्वरुपाचं आहे.
बळाचा वापर करुन प्रादेशिक पक्षातील नेत्यांना फोडायचं आणि गुलामासारखं वागवायचं.
सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा नड्डा यांच्या भाषणाचा कंसातील अर्थ आहे.
त्यामुळे लोकांनी आता वेळ जाण्याच्या आधी विचार करण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | think what would happen to you if the days were reversed says uddhav thackeray to jp nadda

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केलं, त्याचीच फळे भोगत आहेत’, शिंदे गटातील आमदाराचा घणाघात

 

Inflation In India | महागाईवर गदारोळ ! पीठ, तेल, गॅसपासून पेट्रोल-डिझेलने जनतेला रडवले, एका वर्षात किती वाढले दर

 

Former CM Ashok Chavan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्याच्या तयारीत ? चर्चांवर स्वत:च दिलं स्पष्ट उत्तर