Uddhav Thackeray | बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल, शिवसैनिकांनी ज्यांना मोठे केले ते खोक्यात गेले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांना शिवसैनिकांनी (Shiv Sainik) खस्ता खाऊन मोठे केले ते खोक्यात गेले, अशी टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) केली. ते आज उस्मानाबादहून (Osmanabad) आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर नेऊन शिवबंधन (Shivabandhan) बांधले. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपा, केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah) आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

 

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेना आणि शिंदे गटातील वादावर महत्त्वाची सुनावणी असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेली टीका महत्वाची ठरत आहे. आई भवानीवर विश्वास असून, विजय आपलाच होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. तर, शिंदे गटातील बंडखोर नेत्यांवर टीका करताना ते खोक्यात गेले, असे ठाकरे म्हणाले. यावेळी, धाराशिवमधील उपस्थित शिवसैनिकांनी 50 खोक्के एकदम ओक्के अशा घोषणा दिल्या.

 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आपले कुठेही काही वाकडे झालेले नाही. भवानी मातेची कृपाच आहे
आपल्यावर. केवळ कृपाच नाही तर तिने दाखवून दिले की, खरे कोण आणि खोटे कोण.
छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) भवानी मातेने तलवार दिली होती,
अशी आपली श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ही तलवार दिली आहे, तू लढ मी आहे पाठिशी.
आज शिवसेना लढत असताना अनेकजण सोबत येत आहेत, त्यामुळे त्यांचे कौतुक आहेच, पुन्हा दसर्‍याला आपण भेटणार आहोतच.

 

Web Title :- Uddhav Thackeray | those raised by the shiv sainiks went into the box thackeray targets shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली