ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांबाबत राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंत्राटी डॉक्टरर्सचे आणि त्यांचे मानधान समान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि29) याबाबत माहिती दिली. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

अशी आहे वाढ

– आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार

– आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजार ऐवजी 75 हजार

– इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार

– इतर भागातील विशेषज्ज्ञ डॉक्टरर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like