Uddhav Thackeray | बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी मुख्यमंत्री कामाख्या देवीला नवस करणार की नाहीत? – उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक भवन बांधणार आहोत, अशी घोषणा केली आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. बेळगाव प्रश्नासाठी मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी ते नवस का करत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.

 

कर्नाटक सरकार सोलापूरमध्ये कर्नाटक भवन बांधणार असल्याचे मी वर्तमानपत्रांत वाचले. मग सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील, तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी ते कामाख्या देवीला नवस का करत नाहीत?, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. साधारणत: प्रत्येक राज्यात इतर राज्यांची भवने असतात. मात्र, आपले आणि कर्नाटकचे नाते काय, हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला गेला. त्याबद्दलदेखील मुख्यमंत्री एक शब्द बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

मागील काही दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोट भागांतील काही गावांवर दावा केल्यापासून या वादाला सुरुवात झाली आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने उच्च व तंज्ञशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई हे कर्नाटकला जाणार होते.
पण त्यांना येण्यास बोम्मई यांनी मनाई केली आहे. त्यामुळे ते पुढील आठवड्यात जाण्याची शक्यता आहे.
येत्या काळात मुख्यमंत्री बेळगाव आणि सीमाप्रश्नावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray criticized cm eknath shinde on maharashtra karnatak border issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल