Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्ला चढवला आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) चोरलं असलं तरी प्रभू श्रीराम (Prabhu Shree Ram) माझ्यासोबत आहेत. त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होते. आता राजकारणात (Maharashtra Politics News) प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन दगड तरंगत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. निमित्त होते थेट रामटेकहून (Ramtech) मुंबईपर्यंत पायी चालत आलेल्या काही शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांच्या कौतुकाचं. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ज्या हिंमतीनं रामटेक ते इथपर्यंत पायी येणं ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. धनुष्यबाण जरी कागदावर नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत तर हे ब्रह्मास्त्र आहेत. हे सगळे ब्रह्मास्त्र माझ्याबरोबर आहेत.

कोणीतरी एखाद्यासठी एवढ्या किलोमीटरपर्य़ंत पायपीट करत येणं अशक्य आहे. मातोश्रीवर येऊन तुम्हाला माझ्यासोबत उभ राहावं वाटतं,
याला मी रामाचा आशीर्वादच मानतो. लोकशाही वाचवणं हे केवळ माझ्या एकट्याचं काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही.
आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. राम सेतू बांधताना वानर सेना होतीच पण खार सुद्धा होती, मग आपण एकत्र आलो तर लंकादहन का करु शकत नाही? तुम्ही रामटेकवरुन निघालात आणि राम नवमीला (Ram Navami) इथे पोहचलात. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

त्यावेळी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन दगड टाकला तरी तो तरंगायचा. आता राजकारणात तेच झालंय.
प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते.
आता दगडच तरंगतायत आणि दगडच राज्य करतायत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय?
ते रामभक्तांचं काम मला तुमच्याकडून अपेक्षित असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray mocks cm eknath shinde bjp on ram navmi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी