Uddhav Thackeray | ‘तयार रहा, गाफील राहू नका’, उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्तासंघर्षाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाची प्रत देऊन यामधील महत्त्वाचे मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवा. त्यांच्या मनातील संभ्रम दूर करा अशा सूचना दिल्या. तसेच मुबंई महापालिकेसह (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. यामुळे तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिले.

न्यायलयाच्या निकालानंतर निर्माण झालेले जिल्हाप्रमुखांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात आले असून आता राज्यातील कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी या जिल्हा प्रमुखांकडे असणार आहे. 18 जून रोजी मुंबईतील वरळी एनएससीआय डोम (Worli NSCI Dome) येथे भव्य पदाधिकारी मेळावा आयोजित केला जाणार आहे. तर 19 जून रोजी षण्मुखानंद सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरुन संभ्रम निर्माण करत असल्याचं
ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आलं. त्यामुळे या निर्णयातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे
जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हा प्रमुखांकडे असेल. यावेळी जिल्हा प्रमुखांच्या
शंकांचं निरसन आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली.

Web Title : Uddhav Thackeray | uddhav thackeray mumbai shivsena meeting appeal to district shakha head on maharashtra political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole on Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘गैरसमज निर्माण केला जात असेल तर…’

Lok Sabha Election 2024 | राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, विभागवार नेत्यांना दिली जबाबदारी; पुणे विभागाची जबाबदारी ‘या’ तरुण नेत्यावर

MLA Sanjay Shirsat | राज्यातील हिंसाचारामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का?, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची शिरसाट यांची मागणी