Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे मिशन 40! शिंदे गटाच्या आमदारांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली. ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. त्यामुळे शिवसेनेच्या मतांची देखील विभागनी झाली आहे. आता शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे यांच्या विरोधात कंबर कसली आहे. शिंदेसह त्यांच्या 40 आमदारांना त्यांच्याच मतदार संघात धूळ चारण्याची रणनीती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आखली आहे.

 

आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मातोश्रीवर रोज विविध बैठका होत आहेत. विधानसभा आणि लोकसभा मतदार संघांचा आढाव सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून घेतला जात आहे. विशेष करुन बंडखोर चाळीस आमदारांच्या मतदार संघाचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रामुख्याने आढावा घेत आहेत. या मतदार संघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे गट चर्चा करत आहे. ज्यांना मागील निवडणुकांत तिकीट देता आले नाही, अशा लोकांचा ठाकरे गटाकडून विचार सुरु आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत ठाकरे गटाकडून शिंदे यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे हे सर्व विधानसभा आणि लोकसभा मतदार संघातील असंतोषी आणि नाराज कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या विरोधात बळकट करत आहेत.
त्यामुळे शिंदे यांना पुढील निवडणुकांत लोळविता येईल. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रिक्त जागांवर पदाधिकारी आणि इतरांची नेमणूक केली जात आहे.
शिवसेनेसमोर देखील महाबलाढ्य भाजप (BJP) आहे. त्यात भाजपने शिंदे यांचा गट सोबतीला घेऊन शिवसेनेची मते निवडणुकीपूर्वीच फोडली आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत देखील संधान बांधण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.
त्यामुळे शिवसेनेसमोरील आव्हाने मोठी असणार आहेत. त्याला उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना कश्याप्रकारे सामोरी जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray planning 40 rebel shivsena mla constituency upcoming elections marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | रूफटॉपवर बेकायदेशीररित्या हॉटेल व्यवसाय करणार्‍या 8 जणांविरोधात महापालिकेची फौजदारी कारवाई

Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’